इंडियन ॠतू
अनाहूत आलेल्या वादळाने उडवून नेलीत काही पत्रे, तुटून पडले काही पंख..! सोबतीने आलेला मित्र शांत थोडीच राहणार…! जीव तोडून बँकेचे हप्ते भरले जात होते.. समतल केलेल्या जमिनीला बांधलेले बांध मात्र साथ सोडून पळाले अन् वावरेच धो – धो वाहू लागली! तुटलेल्या छपराला चिकटलेले आहेत फक्त काही कोरडे अश्रू! एक बैल डोंगर पायथ्याशी मरून पडलाय.. एकमेव …